आवृत्ती पुणे
← Back to Homepage

महिला अधिकारी-अंमलदारांनी केली मेट्रोची सफर

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • March 9, 2022
Spread the love

जागतिक महिला दिनानिमित्त लष्कर पोलीस स्टेशनचा अनोखा उपक्रम

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त यशवंत गवारी, लष्कर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्याबरोबर लष्कर पोलीस स्टेशनमधील महिला अधिकारी व अंमलदार यांनी गरवारे कॉलेज ते आनंदनगर असा मेट्रो प्रवास केला.

लष्कर पोलीस स्टेशनमधील संवाद हॉलमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी महिलांचे स्वास्थ्य चांगले राहावे, यासाठी योग प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात लष्कर पोलीस स्टेशनमधील महिला अधिकारी, अंमलदार, दक्षता कमिटी, शांतता कमिटी व पंख संस्थेच्या महिला सदस्यांनी सहभाग घेतला.

get_footer();