आवृत्ती पुणे
← Back to Homepage

‘फिल्म अ‍ॅकॅडमी’च्या संचालिकेला बेदम मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • April 8, 2022
Spread the love

शिवाजीनगर पोलिसांत फिर्याद : शिवाजीनगर येथील इन्स्टिट्युटची केली तोडफोड

महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क

पुणे : कोर्स पुर्ण केल्यानंतर काम मिळत नसल्याच्या रागातून फिल्म अकॅडमीच्या संचालिकेला फरफटत नेत मारहाण करून कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या 14 जणांवर शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. संतप्त विद्यार्थी, प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आणि एका माजी कर्मचाऱ्याने हे कृत्य केले आहे. हा प्रकार 27 मार्च रोजी दुपारी सव्वा तीन च्या दरम्यान घडला आहे.

चार महिला, प्रशांत काटकर (वय-28), प्रहार चित्रपट संघटनेचा मंगेश शिरसाठ (वय-27) यांच्यासह 7-8 पुरुष व महिलांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी 30 वर्षीय महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी यांचे फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर एक संस्था आहे. याठिकाणी विद्यार्थ्यांना अभिनयाचे व इतर प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. या संस्थेत प्रशांत काटकर हा काम करत होता. त्याला काही दिवसांपूर्वी कामावरुन काढून टाकले आहे. तर फिर्यादी यांच्याकडे विद्यार्थी म्हणून असलेल्यांना अद्याप काम मिळालेले नाही. काम न मिळाल्याचा राग मनात धरुन सर्वजण 27 मार्च रोजी अकॅडमीच्या कार्यालयात बेकायदा घुसले. यानंतर त्यांनी कार्यालयातील काचेची फ्रेम, फ्लेक्स, रस्त्यावरील जाहिरीतीचे फ्लेक्स असे एकूण 20 हजार रुपयांचे नुकसान केले. यानंतर फिर्यादी यांचे केस ओढून त्यांना हाताने बेदम मारहाण करुन फरफटत नेऊन जखमी केले. यामध्ये त्यांची चेन गहाळ झाली. या घटनेचे चित्रीकरण इशान लोखंडे व प्रशांत काटकर आणि मंगेश शिरसाठ यांच्या मोबाईलमध्ये केले. तसेच, हे चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

get_footer();