आवृत्ती पुणे
← Back to Homepage

फ्लॅटचे कुलूप उचकटून दोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • March 28, 2022
Spread the love

सिंहगड रोड पोलिसांत फिर्याद : वडगाव बु। मधील दागंट पाटीलनगरमध्ये घडला चोरीचा प्रकार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : फ्लॅटचे कुलूप उचकटून एक लाख रुपये रोख आणि सोन्याचे दागिने असा एकूण दोन लाख ११ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. वडगाव बु।मधील दांगट पाटीलनगरमध्ये शुक्रवारी (दि. २५ मार्च २०२२) रोजी रात्री आठ ते सव्वा दहाच्या दरम्यान चोरट्यांनी संधी साधली.

प्रकाश धुमाळ (वय ३८, रा. वडगाव बु।।, पुणे) यांनी सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, वडगाव बु।मधील दांगट पाटीलनगरमध्ये फिर्यादीचा फ्लॅट कुलूपबंद असताना चोरट्यांनी कुलूप उचकटून एक लाख रुपये रोख आणि सोन्याचे दागिने असा एकूण दोन लाख ११ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विशाल शिंदे पुढील तपास करीत आहेत.

get_footer();