आवृत्ती पुणे
← Back to Homepage

कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी नियमांचे पालन करा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 6, 2022
Spread the love

कविदास जांभळे : पोलीस रेझिंग डेनिमित्त लष्कर पोलिसांनी केले फळवाटप

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोना महामारीने पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे शासनाने लागू केलेल्या नियमांचे पालन करून स्वतःबरोबर इतरांनाही सुरक्षित ठेवण्यासाठी मदत करावी, असे आवाहन लष्कर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) कविदास जांबळे यांनी केले.

पोलीस रेझिंग डेनिमित्त लष्कर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) कविदास जांभळे यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी कॅम्पमधील पूना कॉलेजच्या प्रेम निवास वृद्धाश्रमाला भेट देऊन ब्लँकेट व फळे दिली. यावेळी जांभळे यांनी वृद्धाश्रमामधील मंडळींना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत संवाद साधला. याप्रसंगी महिला अंमलदार रहिशा शेख, पोलीस अंमलदार भारत सपकाळ, रामहरी वनवे, संभाजी दराडे, नितीन नुय्या उपस्थित होते.

प्रेम निवास वृद्धाश्रमच्या व्यवस्थापिका सिस्टर बेना यांनी लष्कर पोलीस स्टेशनच्या अधिकारी – कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

get_footer();