आवृत्ती पुणे
← Back to Homepage

FoSCoS प्रणालीवर अन्न व्यावसायिकांनी अद्ययावत माहिती नोंदवावी

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • April 8, 2022
Spread the love

Foscos.fssai.gov.in संकेतस्थळावर परवाना/नोंदणी अर्ज क्रमांक आधारित User ID सुरू

महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क

सोलापूर : अन्न परवाना/नोंदणी साठी Foscos.fssai.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. परवान्यासाठी अथवा नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज केले आहेत, त्यांना परवाने/नोंदणी मंजुर झालेले आहेत. परंतु त्यामध्ये अन्न व्यावसायिकांनी त्यांचा वैयक्तिक मोबाईल नंबर व ईमेल नमुद केलेले नसेल, तर त्यांनी तात्काळ ऑनलाईनमध्ये वैयक्तिक माहिती अद्यावत करुन घ्यावे, असे अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त प्रदीप रौउत यांनी असे आवाहन केले.

अन्न व्यावसायिकांनी ज्यांच्याकडून अर्ज केलेला आहे त्यांच्याकडून माहिती अद्यावत करुन घ्यावे, जर त्यांनी नकार दिल्यास सदरची माहिती अद्यावत करण्यासाठी कार्यालयात अर्ज करुन त्यांचे वैयक्तिक माहिती अद्यावत करुन घ्यावी. अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरणाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या मार्गदर्शक सुचना संबंधित अन्न व्यावसायिकांपर्यंत पोहोचतील.

अन्न व्यावसायिकांना वैयक्तिक माहिती अद्यावत करण्यासाठी खालील प्रमाणे आस्थापनेच्या लेटरहेडवर अधिकृत/ जबाबदार व्यक्तीची सही असावी, विनंती अर्जासोबत अधिकृत व्यक्तीचे ओळखपत्र जोडलेले असावे, विनंती अर्जासोबत मंजुर परवाना/नोंदणी प्रमाणपत्राची झेरॉक्स प्रत जोडलेली असावी.

तसेच उत्पादक, रिपॅकर, रिलेबर्ल्स, दुग्धजन्य पदार्थ उत्पादक यांनी ऑनलाईन Foscos.fssai.gov.in या संकेतस्थळावर वार्षिक परतावा अपलोड करावे त्यासाठी दिनांक 31 मे 2022 पर्यंत मुदत आहे. त्यांनतर प्रत्येक दिवसाला रुपये 100/- प्रमाणे विलंब शुल्क भरावे लागेल. सन 2021-22 चे डि-1 परतावा हे फक्त ऑनलाईन अपलोड करावेत, सदर वार्षिक परतावा कार्यालयात जमा करु नयेत. तसेच दुग्ध व दुग्धजन्य पदार्थ उत्पादक यांना वर्षातुन दोन वेळा डि-2 फॉर्म भरावे लागत होते त्यांना देखील वर्षातुन एकदा डि-1 फॉर्म ऑनलाईन पध्दतीने भरणे आवश्यक आहे याची सर्व अन्न व्यावसायिकांनी नोंद घ्यावी. अशी माहिती प्रदीप रौउत यांनी दिली.

get_footer();