आवृत्ती पुणे
← Back to Homepage

कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने चार प्रसिद्ध हॉटेलवर कारवाई

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 7, 2022
Spread the love

मुंढवा पोलिसांची कारवाई : कोरोना नियम व अटींकडे केले दुर्लक्ष्य

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाकडून गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच दोन डोस घेतलेल्या व्यक्तींनाच कार्यालय, उपहारगृह, हॉटेलमध्ये प्रवेश देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, कोरोना नियमांचे उल्लंघन करुन ग्राहकांना हॉटेलमध्ये प्रवेश देणाऱ्या पुण्यातील चार हॉटेलवर मुंढवा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कारवाई केली आहे.

पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून रुग्णांची संख्या हजाराच्यावर गेली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लसीकरण आणि गर्दी टाळणे हाच प्रभावी उपाय असल्याने प्रशासनाने नियम व मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार मास्क अनिवार्य करण्यात आले असून मॉल, हॉटेल व अन्य सार्वजनिक ठिकाणी दोन डोस घेतलेल्या व्यक्तींनाच परवानगी आहे. परंतु पुण्यातील मुंढवा परिसरातील चार हॉटेल चालकांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. मुंढवा परिसरातील चार बड्या हॉटेलांना याचा पहिला फटका बसला आहे.

मुंढवा परिसरातील हॉटेल ड्रंक अँड पांडा, अजेंट जॅक, हॉटेल मेट्रो आणि हॉटेल लोकलमध्ये नियमांचे सर्रास उल्लंघन सुरु होतं. लसीचे दोन डोस पूर्ण न झालेल्या व मास्क नसलेल्या व्यक्तींनाही हॉटेलमध्ये प्रवेश दिला जात असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी या हॉटेवर कारवाई करुन हॉटेल मॅनेजरवर 188, 269, 270 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

हॉटेल ड्रंक अँड पांडाचा मॅनेजर रवी जनार्दन घोडके (वय-24), लोकल हॉटेलचा मॅनेजर मारुती कोंडीबा गोरे (वय-31), हॉटेल मेट्रोचा मॅनेजर कुणाल दशरथ मद्रे (वय-26) आणि हॉटेल अजेंट जॅकचा मॅनेजर राम जगन्नाथ गाढवे (वय-32) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी यांनी सांगितले की, पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील यांच्या सुचनेनुसार हद्दीमध्ये तपासणी केली जात असताना या चारही हॉटेल्समध्ये पोलिसांना हॉटेलच्या क्षमतेपेक्षा 50 टक्के याच्यापेक्षा जास्त गर्दी जमलेली दिसून आली. हॉटेल व्यवस्थापकाने शासनाने लागू केलेल्या कोरोना नियम व अटीच्या अधीन राहून हॉटेल व्यवसाय चालवणे आवश्यक होते. परंतु तसे काही केले नसल्याने 50 टक्के क्षमतेपेक्षा जास्त ग्राहक ठेवून नियमांचा भंग केला म्हणून ही कारवाई करण्यात आली.


get_footer();