आवृत्ती पुणे
← Back to Homepage

चार वर्षांपासून गुंगारा देणाऱ्या सराईतास ठोकल्या बेड्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • March 12, 2022
Spread the love

भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई : कात्रज स्मशानभूमीसमोर सापळा रचून केली अटक

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : चार वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या. दाखल गुन्ह्यातील आरोपी कात्रज स्मशानभूमीसमोर उभा असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून अटक केली.

संतोष राजेंद्र जगताप (वय २९, रा. कात्रज, नवीन वसाहत, गणपती मंदिरामागे, कात्रज, मूळ गाव-मु.पो. बेंबळे, ता. माढा, जि. सोलापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

कात्रज पोलीस स्टेशनमधील दाखल गुन्ह्यातील आरोपी चार वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. तो कात्रज स्मशानभूमीसमोर उभा असल्याची माहिती सूत्रांकडून पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सापळा रचून आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली. आरोपीकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संगीता यादव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे, अंमलदार रवींद्र चिप्पा, गणेश भोसले, सचिन पवार, हर्षल शिंदे, आकाश फासगे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, विक्रम सावंत, गणेश शेंडे, आशिष गायकवाड, अवधूत जमदाडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

get_footer();