आवृत्ती पुणे
← Back to Homepage

गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव करणारी पत्नी जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • April 9, 2022
Spread the love

उत्तमनगर पोलिसांची कामगिरी : पत्नीनेच गळा दाबून केला होता पतीचा खून

महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क

पुणे : चारित्र्याच्या संशयावरुन त्रास देणार्‍या पतीचा गळा दाबून खून केल्यानंतर त्याने गळफास घेतल्याचा पत्नीने केलेला बनाव उत्तमनगर पोलिसांनी उघडकीस आणला असून पत्नीला अटक केली आहे. हा प्रकार ५ एप्रिल रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता घडला होता.

नंदिनी रमेश भिसे ऊर्फ नंदिनी राजू धस (वय ४०, रा. लांडगे निवास, उत्तमनगर) असे अटक केलेल्या पत्नीचे नाव आहे. रमेश भिसे असे खून केलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक पी. एम. वाघमारे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, रमेश व नंदिनी हे पती-पत्नी असून रमेश हा काहीही कामधंदा करीत नव्हता. दारु पिऊन पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन वारंवार पैशांची मागणी करत. तिच्या माहेरच्या नातेवाईकांसमक्ष तिला अपमानास्पद वागणूक देत असे. ५ एप्रिल रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता त्याने नंदिनी हिला स्वयंपाक करुन दिला नाही, या करणावरुन वादावादी झाली होती. त्यानंतर रमेश हा झोपला. तेव्हा नंदिनी हिने नॉयलॉन दोरीने त्याचा गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याची बॉडी उठवून बसविली. त्याच्या गळ्यात दोरी टाकून ती दोरी लोखंडी हुकास बांधली व पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली, असा बनाव केला. पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास मुलाला व नातेवाईकांना बोलावून पतीने गळफास लावून घेतल्याचे दाखवून त्याचे गळ्यातील दोरी काढून त्याला फरशीवर झोपविले. त्यानंतर पोलिसांना रमेशने गळफास घेतल्याची माहिती दिली. रमेश याचा मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. त्यात रमेश याचा मृत्यु गळा आवळून झाल्याचा डॉक्टरांचा अहवाल आला. त्यावरुन पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल करुन नंदिनी भिसे हिला अटक केली आहे. न्यायालयाने तिला १२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

get_footer();