आवृत्ती पुणे
← Back to Homepage

गॅस एजन्सी मालकाला १४ लाखांचा गंडा घालणारा अटकेत

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 27, 2022
Spread the love

दत्तवाडी पोलिसांची कामगिरी : आरोपीकडून सर्व रक्कम केली हस्तगत

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : गॅस एजन्सीमध्ये जमा झालेली रक्कम बँकेत न भरता मालकाला 14 लाखांचा गंडा घालणाऱ्या आरोपी कामगाराला दत्तवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीकडून गुन्ह्यातील सर्व रक्कम जप्त केली आहे. आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला मात्र, पोलिसांनी त्याला शनिवारी (दि.26) अटक केली. हा प्रकार दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ढमढेरे गॅस एजन्सीमध्ये घडला होता.

गजेसिंह उम्मेदसिंह राठोड (वय २६, रा. बिबवेवाडी, मूळ- रा. करणीपुरा, ता. औसीया जि. जोधपूर, राजस्थान) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी गॅस एजन्सीचे मालक स्वप्नील सुहास ढमढेरे (वय ४३, रा. लॉ कॉलेज रोड, पुणे) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
आरोपी हा फिर्यादी यांच्या गॅस एजन्सीमध्ये मागील पाच ते सहा वर्षापासून गॅस मेकॅनिकचे काम करतो. फिर्यादी हे आरोपीला नेहमी बँकेत पैसे भरण्यासाठी पाठवत असल्याने आरोपीला जमा होणाऱ्या रक्कमेबाबत माहिती होती. 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता फिर्यादी यांनी 14 लाख 13 हजार 160 रुपये बँकेत जमा करण्यासाठी आरोपीकडे दिले होते. मात्र, आरोपीने पैसे बँकेत जमा न करता पैसे घेऊन फरार झाला.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस ठाण्यातील तीन पथके तयार करुन आरोपीचा शोध सुरु करण्यात आला. आरोपीचा शोध घेत असताना आरोपी राजस्थान येथे पळून गेल्याची माहिती मिळाली. मात्र, आरोपी शनिवारी (दि.26) मित्रांना भेटून पुन्हा राजस्थानला पळून जाण्याच्या तयारीत असून तो लक्ष्मीनारायण चौकातील होल्गा हॉटेलजवळ उभा असल्याची माहिती पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे व राहुल ओलेकर यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला गुन्ह्यातील मुद्देमालासह अटक केली.

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे करीत आहेत. पोलिसांची केली दिशाभूल आरोपी हा ढमढेरे गॅस एजन्सीमध्ये पाच ते सहा वर्षापासून कामाला होता. ही गॅस एजन्सी पुणे शहरातील वेगवेगळ्या भागात हिंदुस्तान पेट्रोलियम गॅस विक्रेते आहे. आरोपीला गॅस एजन्सीच्या कामकाजाची तसेच रोख रक्कमेची पुर्ण माहिती होती. आर्थिक चणचण असल्याने त्याने मालकाने बँकेत जमा करण्यासाठी दिलेली रक्कम घेऊन फरार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपीने फरार होताना पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्याची दुचाकी सिंहगड रोडवर लावून गाडीची चावी आणि मोबाईल फेकून दिला. मात्र पोलिसांनी तपास करुन आरोपीला अटक केली.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 पौर्णिमा गायकवाड, सिंहगड रोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सुनील पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार, चंद्रकांत कामठे पोलीस हवालदार कुंदन शिंदे, राजु जाधव, प्रकाश मरगजे, राहुल ओलेकर, विष्णू सुतार, शिवाजी क्षीरसागर, अक्षयकुमार वाबळे, नवनाथ भोसले, भरत अस्मार, प्रमोद भोसले, दयानंद तेलंगेपाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

get_footer();