आवृत्ती पुणे
← Back to Homepage

गॅस सिलेंडरमधील गॅस चोरणाऱ्या टोळीला ठोकल्या बेड्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • April 8, 2022
Spread the love

गुन्हे शाखा युनिट-2ची कारवाई : आरोपींकडून 2.71 लाखाचा मुद्देमाल केला जप्त

महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क

पुणे : गॅस स्फोटकाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी गॅस सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्यांवर टोळीचा गु्न्हे शाखेच्या युनिट-2ने पर्दापाश केला. लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उरुळी देवाची येथे कारवाई करून 2 लाख 71 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींना 9 एप्रिलपर्यंत पोलीस कस्टडी मिळाली आहे.

जयकिसन मियराम बिश्नोई (वय-32), जगदिश नारायणराम बिश्नोई (वय-27), हनुमान देवराम बिश्नोई (वय-25 तिघे रा. उरुळी देवाची, मुळ रा. बावडी जिल्हा जोधपुर, राजस्थान), चंद्रहास लक्ष्मण वायगंडे (वय-45 रा. उरुळी देवाची, वज्रेश्वरी देवी मंदिरामागे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. याप्रकरणी मंडळ अधिकारी, अनधिकृत बिनशेती क्र.2 हवेली चनबस रामराव गवंडी (रा. सासवड) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उरुळी देवाची येथील एका घरामध्ये बेकायदेशीर गॅस सिलेंडरचा साठा केला आहे. तेथे भरलेल्या सिलेंडरमधून गॅस काढून घेऊन तो एका रिकाम्या सिलेंडरमध्ये नळीद्वारे अनधिकृतरित्या भरला जात असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाला सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी उरुळी देवाची येथील वज्रेश्वरीदेवी मंदिराच्या पाठिमागील गोडावुनवर सकाळी साडेसात वाजता छापा टाकला. घराची पाहणी केली असता घरात व टेम्पोमध्ये ठेवलेले 19 किलो वजनाचे 53 हजार 300 रुपये किमतीचे 31 सिलेंडर आणि 2 लाखाचा टेम्पो पोलिसांनी जप्त केले. तर चंद्रहंस वायगंडे याच्या घरासमोरील मोकळ्या जागेतून आणि चारचाकी टेम्पमधून 6 रिकामे गॅस सिलेंडर जप्त केले. या दोन्ही कारवाईत गॅस सिलेंडर, टेम्पो असा एकूण 2 लाख 71 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. युनिट-2चे पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड पुढील तपास करत आहेत.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे,
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखालीपोलीस पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, पोलीस अंमलदार यशवंत आंब्रे, किशोर वग्गु, अस्लम पठाण, नामदेव रेणुसे, संजय जाधव, महिला पोलीस हवालदार साधना ताम्हाणे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

get_footer();