आवृत्ती पुणे
← Back to Homepage

घरात घुसून नवविवाहितेवर अत्याचार करणारा जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 20, 2021
Spread the love

हिंजवडी पोलिसांची कामगिरी : मानव जातीला काळीमा फासणारी घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरात एका 19 वर्षाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली असतानाच हिंजवडीमध्ये एका महिलेच्या घरात घुसून लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना सुसगांव (ता. मुळशी) येथे गुरुवारी (दि.16) घडली आहे.

याप्रकरणी 26 वर्षीय पीडित महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी राजेंद्र नागनाथ जाधव (वय-40 रा. सुसगांव, मुळशी) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि.16) दुपारी 12.30 ते 12.50 या दरम्यान आरोपी राजेंद्र जाधव हा पीडित महिलेच्या घरात जबरदस्तीने घुसला. त्याने महिलेला ओढत दुसऱ्या खोलीत नेले व दरवाजा आतून बंद करुन तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला.

पीडित महिलेने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक केली. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक बोरकर व पोलीस उपनिरीक्षक काकडे करत आहेत.

get_footer();