आवृत्ती पुणे
← Back to Homepage

घरफोडी करणाऱ्या सराईतांच्या मुसक्या आवळल्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 6, 2021
Spread the love

कोंढवा पोलिसांची कामगिरी : तीन लाख ३० हजारांचा ऐवज केला जप्त

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : डिश टीव्ही दुरुस्तीच्या बहाण्याने घरात घुसून चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या कोंढवा पोलिसांनी मुसक्या आवळल्या. आरोपीकडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि दुचाकीसह एकूण तीन लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. कोंढवा बुद्रुक येथील पानसरेनगर येथे ९ ऑक्टोबर २०२१ रोजी चोरीची घटना घडली होती.

मनिष मूर्ती पुजारी (वय २८, रा. रामनगर, रामटेकडी, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी ज्ञानेश्वर धोंडिबा मरगळे (वय ३८, रा. गल्ली नं.३, पानसरेनगर, कोंढवा बुद्रुक, पुणे) यांनी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती.

पोलिसांनी सांगितले की, ज्ञानेश्वर धोंडिबा मरगळे ९ ऑक्टोबर २०२१ रोजी लहान मुलांना घरात ठेवून पत्नीसह कामाला गेले. दरम्यान, तुझ्या वडिलांनी आम्हाला डिशचा रिचार्ज करायला सांगत एक अनोळखी व्यक्ती घरात आली. डिशची वायर लूज झाली असून, मुलाला गोठ्यामध्ये वायर धरून उभे केले. त्याचवेळी कपाटातील मंगळसूत्र, सोन्याची पोत असा मुद्देमाल चोरून नेला होता.

कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जगन्नाथ जानकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गोकुळ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील व अंमलदार यांनी तपास सुरू केला. दरम्यान, पोलीस नाईक जोतिबा पवार, सतीश चव्हाण यांना घरफोडी करणारी व्यक्ती येवलेवाडी-कोंढवा बुद्रुक येथे थांबल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील यांच्यासह पोलीस हवालदार रमेश गरुड, पोलीस नाईक जोतिबा पवार, सतीष चव्हाण, गोरखनाथ चिकणे, निलेश देसाई, तुषार आल्हाट, पोलीस अंमलदार किशोर वळे व लक्ष्मण होळकर यांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेऊन एक दुचाकी, सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा एकूण तीन लाख ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.

कोंढवा पोलिसांच्या कामगिरीचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी अभिनंदन केले आहे.

get_footer();