आवृत्ती पुणे
← Back to Homepage

घरफोडी करून दोन लाखांचा ऐवज लंपास करणाऱ्यावर गुन्हा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 2, 2022
Spread the love

कोंढवा पोलिसांत फिर्याद ः येवलेवाडीतील डॉ. मिनू मेहता सोसायटीमध्ये झाली चोरी

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : घरफोडी करून रोख दहा हजार रुपये आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण दोन लाख ५२ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. येवलेवाडी येथील डॉ. मिनू मेहता सोसायटीमध्ये ३१ डिसेंबर २०२१ रोजी रात्री बाराच्या सुमारास हा चोरीचा प्रकार घडला.

ऋषिकेश पवार (वय २०, रा. येवलेवाडी, पुणे) यांनी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगिलते की, फिर्यादीच्या चुलत्याचे दोन मजली घर आहे. त्यांनी तळमजल्यावर घर कुलूप लावून बंद केले. दरम्यान, चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप उचकटून रोख रक्कम दहा हजार रुपये आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण दोन लाख ५२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. कोंढवा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक रणजित मोहिते पुढील तपास करीत आहेत.

get_footer();