आवृत्ती पुणे
← Back to Homepage

घरफोडीसाठी आला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 23, 2022
Spread the love

गु्न्हे शाखा युनिट-२ची कामगिरी : ३० गुन्हे उघड, चार लाख रुपयांचा मु्द्देमाल जप्त,

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : घरफोडीसाठी आलेल्या अट्टल चोरट्याला गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने जेरबंद केले. त्याच्याकडून पावणेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, त्याच्यावर घरफोडी आणि चोरीचे ३० गुन्हे दाखल असल्याचे उघडकीस आले.

चंद्रकांत ऊर्फ चंद्या अनंत माने (वय २९, रा. मोरया हौसिंग सोसायटी, चाफेकर चौक, वेताळनगर, चिंचवडगाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यातील समांतर तपास सुरू असताना आरोपी जांभुळवाडी तलाव येथे घरफोडी करण्यासाठी येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेत सापळा रचून आरोपीला पकडून तपास केला असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

पोलीस कोठडीमध्ये तपास केला असता त्याच्याकडून चार घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून, ९५.३ ग्रॅम सोन्याचे दागिने, ४२ ग्रॅम चांदीचे दागिने, नऊ हजार रोख, गु्न्ह्यासाठी स्पॅनर (पाना) असा एकूण चार लाख ६९ हजार २६२ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीने बंद घराची पाहणी करून स्पॅनरच्या सहाय्याने कडीकोयंडा तोडून घरफोडी करत असल्याचे सांगितले. आरोपीवर घरफोडीचे ३० गुन्हे दाखल असल्याचे तपासात उघडकीस आले.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास गाडगे, सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे, गुन्हे शाखा युनिट-२चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील, सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश मोरे, सहायक पोलीस फौजदार यशवंत आंब्रे, अस्लम पठाण, पोलीस अंमलदार किशोर वग्गू, संजय जाधव, साधना ताम्हाणे, उत्तम तारू, चेतन गोरे, चंद्रकांत महाजन, गजानन सोनुने, निखील जादव, समीर पटेल, कादीर शेख, मितेश चोरमोले, नागनाथ राख यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली.

get_footer();