आवृत्ती पुणे
← Back to Homepage

घरफोड्या करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • March 10, 2022
Spread the love

हडपसर पोलिसांची कामगिरी : २७ मालमत्तेचे गुन्हे उघड, ३३ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : घरफोड्या करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना हडपसर पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून सात घरफोड्या उघडकीस आणल्या असून, १३ तोळे सोने, साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

हडपसर पोलीस स्टेशनमधील तपास पथकाने मागिल महिन्यात १४ घरफोडी, २ जबरी चोरी, २ वाहनचोरी, आर्म ॲक्टप्रमाणे-२ पिस्तुल, २७ राऊंड व ७ ज्वेलर्सला फसविल्याच्या २७ मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणले. आरोपीकडून नऊ लाख ९४ हजार रुपये व इतर चोरी-१ गुन्हा असा ३३ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

अमीर ऊर्फ लकी सलीम पठाण (वय २३, रा. अष्टविनायक सोसायटीसमोर, फुरसुंगी रोड, गजानन नगर, हडपसर, पुणे. मूळ- राऊतनगर, जुना सराटी रोड, अकलूज, जि. सोलापूर) आणि संदीप ऊर्फ रीहान ऊर्फ मॅक्स गायकवाड (रा. शनीनगर, कात्रज, पुणे) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

हडपसर पोलीस स्टेशनमधील तपास पथकाकडून केलेल्या तांत्रिक विश्लेषण आणि सूत्रांकडून घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सापळा रचून आरोपींना ताब्यात घेऊन तपास केला असता आरोपींनी दिवसा घरफोडी केल्याची कबुली दिली. आरोपींनी हडपसर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सहा गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले. दोन्ही आरोपीला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

get_footer();