आवृत्ती पुणे
← Back to Homepage

घोराडेश्वर आणि निगडीत मध्यरात्री खूनाच्या दोन घटना

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 20, 2021
Spread the love

चौघांना घेतले ताब्यात : पूर्व वैमनस्यातून घडला प्रकार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : भांडणात मध्यस्थी केल्याच्या कारणावरून निगडीमध्ये एकाचा खून करण्यात आला. तर शरीर संबंधास नकार दिल्याने घोराडेश्वर येथे चुलत दीराने महिलेचा खून केला. या दोन्ही घटना सोमवारी (दि. 20 सप्टेंबर २०२१) मध्यरात्री उघडकीस आल्या.

संपत गायकवाड (वय 45, रा. अण्णा भाऊ साठेनगर, ओटास्कीम, निगडी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत संपत गायकवाड आणि आरोपी यांच्यात पूर्वी भांडण झाले होते. रविवारी पुन्हा त्यांच्यात भांडण झाले. त्यात संपत यांनी भांडण सोडविण्याची भूमिका घेतली. या कारणावरून आरोपींनी संपत यांना शस्त्राने मारून त्यांचा खून केला.

खुनाची घटना सोमवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास घडली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. आरोपी देखील अण्णाभाऊ साठे नगर येथील असून, चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत मिताली सोमनाथ धडस (वय २५, सध्या रा. थॉमस कॉलनी, देहूरोड. मुळ रा. दहिवडी, सातारा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा चुलत दीर तुकाराम कोंडीबा धडस (वय २४) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिताली आणि संशयित तुकाराम हे रविवारी (दि. १९) घोराडेश्वर डोंगरावर फिरायला गेले होते. त्यावेळी आरोपीने महिलेकडे शरीरसंबंधाची मागणी केली. महिलेने त्यास विरोध केल्याने चिडलेल्या आरोपीने तिचा गळा आवळून खून केला. तसेच, ओळख पटू नये यासाठी महिलेच्या डोक्यात दगड घालून मृतदेह झुडपात फेकून दिला. दरम्यान, सोमवारी पहाटे पोलिसांना घटनेची माहिती मिळाली, त्यानुसार त्यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला.

गुन्हे शाखेच्या पथकाने महिलेची ओळख पटवून आरोपीला ताब्यात घेतले आहे. तपास तळेगाव दाभाडे पोलिस करीत आहेत.

get_footer();