आवृत्ती पुणे
← Back to Homepage

सदुंबरे गावातील हत्याकांडामध्ये गोवलेल्याची निर्दोष मुक्तता

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 16, 2022
Spread the love

जिल्हा व सत्र न्यायाधीश : राजकीय दबावापोटी पोलिसांनी बनवला बळीचा बकरा

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : आरोपीविरुद्ध म्हणणे संशयास्पद असल्याचे मुद्दे वकिलांनी मांडले. पुरावे ग्राह्य धरून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. पी. अग्रवाल यांनी महेंद्र तळपे याची निर्दोष मुक्तता केली.

सदुंबरे (ता. मावळ) तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये २१ मे २०१६ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास दोन अल्पवयीन मुलीवर प्राणघातक हल्ला करून हत्या झाल्याची घटना घडली होती. आरोपीच्या वतीने निलेश दलाल व सागर डोईफोडे यांनी आरोपीतर्फे १२ साक्षीदार तपासले. फिर्यादीस त्यांची केस निःसंशयरित्या सिद्ध करणेकामी अपयश आले. दरम्यान हल्ल्यातून बचावलेल्या फिर्यादीच्या मुलीने दिलेल्या वर्णनानुसार आरोपीचे रेखाचित्र काढून वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध केले होते. याप्रकरणामध्ये तळपे यास पोलिसांनी अटक करून फिर्यादीने मुलीचे लग्न सदर आरोपीसोबत करण्यास नकार दिल्याच्या कारणावरून हत्या व हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप लावला होता. या प्रकरणी पोलिसांवर राजकीय दबाव येत असल्याने व खरा गुन्हेगार न मिळाल्याने पोलिसांनी सदर आरोपीस गुन्ह्यामध्ये गुंतवून बळीचा बकरा बनविला.

दरम्यान, खटल्यामध्ये खोटेपणाने आरोपी म्हणून गोवलेल्या महेंद्र तळपेने तुरुंगात घालविल्याची आयुष्याची नुकसान भरपाई प्रशासनाकडून मिळणार का, आरोपी निर्दोष असेल, तर अपराधी अद्याप मोकाट आहे, त्याचे काय हे प्रश्न तसेच कच्चे कैदी व त्यांचे जामीनाचा प्रश्न या खटल्याद्वारे ऐरणीवर आला आहे.

get_footer();