आवृत्ती पुणे
← Back to Homepage

गुटखा माफियाच्या मुसक्या आवळल्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 30, 2021
Spread the love

सोलापूर ग्रामीण पोलिसांची कामगिरी : चार लाख ६५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

सोलापूर : गुटखा माफियाच्या सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या. आरोपीकडून चार लाख ६५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

अमीर हारून शेख (रा. कारंबा, ता. उत्तर सोलापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले की, राहत्या घरामध्ये गुटखासाठा केल्याची माहिती पोलिसांना सूत्रांकडून मिळाली, त्यानुसार अन्न व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसमवेत पोलिसांनी कारंबा (ता. उत्तर सोलापूर) येथे छापा टाकून चार लाख ६५ हजार ६०० रुपये किमतीचा अवैध गुटका जप्त केला. आरोपीला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती सोलापूरचे अन्न व औषध प्रशासन अधिकारी प्रशांत कुचेकर यांनी दिली.

सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर, सहायक फौजदार राजेश गायकवाड श्रीकांत गायकवाड, पोलीस अंमलदार आबा मुंडे, रवी माने, सचिन गायकवाड, केशव पवार यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

get_footer();