आवृत्ती पुणे
← Back to Homepage

हडपसर-तुकाईदर्शन येथे तलवारीने वार करणारे तिघे जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 9, 2021
Spread the love

हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद : ‘दिवाळी बोनस’ मागितल्याने तरुणावर वार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : केवळ दिवाळी बोनस मागून त्रास देणार्‍यांवर चिडून तिघांनी धारदार शस्त्राने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना हडपसरमधील तुकाईदर्शन येथे घडली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी तिघा जणांना अटक केली आहे. त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

सीताराम खंडु शिंदे (वय ३५) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. निरंजन चित्रनाथ योगी (वय २२), तपीन दिलीप विश्वकर्मा (वय १९), शेरबहादूर ऊर्फ शेरे नवलसिंग विश्वकर्मा (वय २०, सर्व रा. काळेपडळ, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत तुळशीराम खंडू शिंदे (वय ४०, रा. काळेपडळ, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, आरोपी हे चायनिज गाडीवर कुक म्हणून काम करीत असून त्यांचे वडिल सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. तुकाईदर्शन येथील ग्लायडिंग सेंटरच्या पश्चिमेस असलेल्या भिंती लगत हे तिघे ६ नोव्हेंबरला रात्री साडेदहा वाजता थांबले होते. त्यावेळी सीताराम शिंदे हा तेथे आला. त्याने आरोपी यांना दिवाळी बोनस मागितला. कसला दिवाळी बोनस द्यायचा असे म्हणून त्यांच्यात वाद झाला. तेव्हा चिडून त्यांनी गाडीवर असलेल्या धारदार शस्त्राने शिंदे यांच्या गळ्यावर, पाठीवर, पोटावर वार केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. सहायक पोलीस निरीक्षक रत्नाकर गायकवाड तपास करीत आहेत.

get_footer();