आवृत्ती पुणे
← Back to Homepage

हांडेवाडीमध्ये भांडण सोडविणाऱ्या मेव्हण्यांनाच केली मारहाण

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • August 31, 2021
Spread the love

हडपसर पोलीस स्टेशनमध्ये दोघांवर गुन्हा दाखल

पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पती-पत्नीतील भांडणे सोडविण्यासाठी भाऊ आले असताना मेव्हण्यांना कटरने मारहाण करुन जखमी करण्याचा प्रकार हांडेवाडी येथे घडला.

याप्रकरणी मनीष शंकर शिंदे (वय २७, रा. कदमवाक वस्ती, लोणी काळभोर) यांनी हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन हडपसर पोलिसांनी शरद नरेंद्र भोसले, नरेंद्र भोसले (रा. दौलतनगर बंगला, धनकवडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद भोसले हे फिर्यादी मनीष शिंदे यांचे दाजी आहेत. फिर्यादी यांची बहीण आणि त्यांचे दाजी यांच्यात किरकोळ घरगुती कारणावरुन भांडण झाले. फिर्यादी व त्यांचा भाऊ नकुल शिंदे हे भांडण सोडविण्यासाठी हांडेवाडी चौक येथे गेले. दोघे भाऊ आल्याचे पाहिल्यावर शरद भोसले यांना राग आला. त्यांनी प्लॉस्टिक कव्हर असलेला कटरने फिर्यादी व त्यांचे भावाला मारुन शिवीगाळ करुन हाताने मारहाण करुन जखमी केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

get_footer();