आवृत्ती पुणे
← Back to Homepage

हप्ता न दिल्याने ‘बिल्डर’ला मारहाण करुन टोळक्याने लुटले;

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 20, 2021
Spread the love

चॉकलेट शिंदेसह 7 जणांवर गुन्हा : कामशेतमधील राव हॉस्पिटलमागे घडली घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : बांधकाम व्यवसायातून कमविलेल्या पैशातून १ लाख रुपयांचा हप्ता दिला नाही, म्हणून बिल्डरला वाटेत अडवून त्याला टोळक्याने मारहाण केली. त्याच्या खिशातील रोकड जबरदस्तीने चोरुन, लोखंडी टॉमी दगडाने फोडून, कारच्या काचा फोडून, मोडतोड करण्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना कामशेतमधील राव हॉस्पिटलच्या मागे फिर्यादीच्या घराजवळ शुक्रवारी दुपारी सव्वा तीन वाजता घडली.

धनेश ऊर्फ चॉकलेट शिंदे, रोशन ऊर्फ डिग्या शिंदे, अनिकेत शिंदे, श्रीधर हुले, रिकु दाभाडे (सर्व रा. कामशेत, ता. मावळ) व त्यांच्या दोन साथीदारांवर पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी २३ वर्षाच्या तरुण बांधकाम व्यावसायिकाने कामशेत पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

फिर्यादी हे मुळचे विसापूर (ता. तासगाव, जि. सांगली) गावचे राहणारे आहेत. त्यांनी कामशेत परिसरात आपला बांधकामाचा व्यवसाय सुरु केला आहे. चॉकलेट शिंदे व त्याच्या टोळीने फिर्यादीने बांधकाम व्यवसायात कमविलेल्या पैशातून हप्ता म्हणून १ लाख रुपयांची देण्याची मागणी केली होती. त्याला फिर्यादी यांनी नकार दिला.
फिर्यादी हे त्यांच्या लॅन्सर कारमधून शुक्रवारी दुपारी घरी जात असताना मारुती कारमधून आरोपी आले व त्यांनी फिर्यादी यांना अडविले. लोखंडी टॉमी, कोयता व लाकडी काठ्यांनी त्यांना कारवर जोरजोरात फटके मारले. त्यामुळे फिर्यादी हे कारच्या बाहेर आल्यावर चॉकलेट शिंदे याने हातातील टॉमीने त्यांच्या पायावर मारहाण केली. त्यांच्या खिशातील ३७ हजार रुपयांचे पैशांचे पाकिट जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर फिर्यादी यांच्या कारच्या काचा काठ्यांनी व दगडांनी फोडल्या.

लोखंडी टॉमीने कारच्या पत्रे चेंबवुन नुकसान केले. तसेच कारच्या जवळच असलेल्या दुचाकीची मोडतोड केली.

get_footer();