आवृत्ती पुणे
← Back to Homepage

हप्त्याची मागणी करत टोळक्याचा व्हीआयटी चौकात ‘राडा’

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • March 19, 2022
Spread the love

कोंढवा पोलिसांत फिर्याद : पोलिसांकडून भाईगिरी करणार्‍या तिघांना अटक

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : हप्ता देण्यास नकार दिल्याने कोंढव्यातील व्हीआयटी होस्टेल चौकातील स्टॉलमधील साहित्याची तोडफोड करुन एका टोळक्याने कोंढव्यात धुडगुस घातला. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी भाईगिरी करणार्‍या तिघांना अटक केली आहे. काऊंटरमधून ८ हजार रुपये तसेच मोरे यांच्या गळ्यातील १ लाख ५ हजार रुपयांची ३० ग्रॅम वजनाची सोनसाखळी जबरदस्ती हिसकावून चोरुन नेली.

यासीन बाशा मुल्ला (वय २५), मेहबुब बाशा मुल्ला (वय ३०) आणि लालअप्पा कोळी (वय २७) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी संतोष सौदागर मोरे (रा. शिक्षक सोसायटी, गोकुळनगर, कात्रज कोंढवा रोड) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, संतोष मोरे यांचे कात्रज कोंढवा रोडवरील व्हीआयटी होस्टेल चौकात पान टपरी आणि एस कुमार वडेवाले हा स्टॉल आहे. आरोपी व त्यांचा एक मित्र हे बुधवारी रात्री पावणे नऊ वाजता त्यांच्याकडे आले. आम्ही इथले भाई असून आम्हाला दरमहा हप्ता द्यायला लागेल, असे म्हणून पैशांची मागणी करु लागले. तेव्हा मोरे यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यावर आरोपींनी मोरे व त्यांचा मेव्हणा विशाल पवार यांना हाताने मारहाण केली. मोरे यांच्या पाठीवर व पवार यांच्या मानेवर हातातील रॉडने, खुर्च्यांनी मारहाण केली. दोघांच्या हाताचे चावे घेतले. कोंढवा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गपाट तपास करीत आहेत.

get_footer();