आवृत्ती पुणे
← Back to Homepage

अरे देवा! तब्बल २०० लिटर डिझेलची चोरी

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • October 28, 2021
Spread the love

बावधन परिसरातील घटना : पुण्यात रस्त्याकडेला उभा होता ट्रक

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : आजपर्यंत आपण पार्किंगमध्ये लावलेल्या दुचाकीमधून पेट्रोल चोरी केल्याच्या घटना ऐकल्या आहेत. मात्र, आता पेट्रोल डिझेल चोरणाऱ्यांचे धाडस वाढले असल्याचे दिसत आहे. बावधन परिसरात भर रस्त्यात उभा केलेल्या ट्रकमधून तब्बल २०० लिटर डिझेल अज्ञात व्यक्तीने चोरल्याची घटना समोर आली आहे.

ट्रकचालक राकेश विजयसिंग यांनी हिंजवडी पोलिसात याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी शंभरी पार केली आहे. दरवाढीमुळे नोकरदार वर्ग आणि सर्वसामान्य नागरिक हैराण झाला आहे. दुसरीकडे ऐन दिवाळीच्या तोंडावर भाजीपाला देखील महाग झाल्याने प्रत्येक व्यक्तीला महागाईला तोंड द्यावे लागत आहे. अशातच पुण्याच्या बावधनमध्ये सर्व्हिस रस्त्यावर उभा केलेल्या ट्रकमधून डिझेल टाकीचे लॉक उघडून तब्बल 200 लिटर डिझेल अज्ञात व्यक्तीने चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना बावधन परिसरात पहाटेच्या सुमारास घडली असून, हिंजवडी पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.

get_footer();