आवृत्ती पुणे
← Back to Homepage

घरफोडी व वाहनचोरी करणारा सराईताच्या आवळल्या मुसक्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 3, 2021
Spread the love

विमानतळ पोलिसांची कामगिरी : ६ दुचाकी आणि घरफोडीतील दागिने असा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : पुण्यात वाहन चोरी आणि घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला विमानतळ पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सापळा रचून अटक केली आहे. आरोपीने विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या घरफोडी आणि वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी आरोपीकडून 6 दुचाकी आणि घरफोडीच्या गुन्ह्यातील दागिने असा एकूण 2 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई म्हाडा कॉलनीजवळ केली.

टारझनसिंग चंदासिंग भोंड (वय २२, रा, गल्ली नं. 10 पाटील इस्टेट झोपडपट्टी, जुना पुणे मुंबई रोड, शिवाजीनगर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले की, विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोहगाव येथील खंडोबामाळ येथील घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना पोलीस नाईक अंकुश जोगदंड यांना घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी म्हाड कॉलनी जवळ असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीदरम्यान त्याने लोहगाव येथील घरफोडीच्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलीस कोठडी दरम्यान केलेल्या चौकशीत आरोपी घरफोडी करण्यासाठी दुचाकीचा वापर करत असल्याची माहिती समोर आली.

दुचाकीबाबत चौकशी केली असता विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चार आणि पिंपरी व भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून प्रत्येकी एक अशा एकूण सहा दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून 6 दुचाकी आणि दागिने जप्त केले आहेत.

अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त रोहित पवार, सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव, विमानतळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, पोलीस निरीक्षक गुन्हे मंगेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश शेवाळे, सहायक पोलीस फौजदार गणेश साळुंखे, पोलीस हवालदार रमेश लोहकरे, पोलीस नाईक सचिन जाधव, रुपेश पिसाळ, अंकुश जोगदंड, गिरीश नानेकर, विनोद महाजन, शिवराज चव्हाण, हारुण पठाण, नाना कर्चे यांच्या पथकाने केली.

get_footer();