आवृत्ती पुणे
← Back to Homepage

विमाननगरमधील हॉटेलमध्ये हुक्का बारवर छापा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 1, 2021
Spread the love

सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई : विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

विमाननगरमधील हॉटेलमध्ये अवैधरित्या सुरू असलेल्या हुक्का बारवर गुन्हे शाखेने कारवाई केली. दोन लाख तीन हजार ९०० रुपयांचा हुक्का फ्लेवर्स, ११ हुक्का पॉट, चिलीम पाईप व दोन मोटारसायकल जप्त केल्या असून, विमानतळ पोलीस स्टेशमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

हॉटेलमालक सचिन अशोक रणपिसे (वय ३०), अमर संतोष गायकवाड (वय २६, दोघे रा. येरवडा, पुणे) आणि हॉटेल व्यवस्थापक दिलीपकुमार मांगीलाल मालविया (वय २६, रा. हडपसर, पुणे) या तिघांवर विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, सामाजिक सुरक्षा विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण, अंमली पदार्थविरोधी पथक-२चे पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड आणि अंमली पदार्थविरोध पथक-१ गुन्हे व सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी हॉटेलमध्ये बेकायदेशीर हुक्का बार सुरू ठेवून ग्राहकांना हुक्का सेवन करण्यासाठी पुरविला जात होता. त्यामुळे हॉटेल चालक, व्यवस्थापक यांच्याविरुद्ध सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने अधिनियमानुसार विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून, दोन लाख तीन हजार ९०० रुपयांचा हुक्का फ्लेवर्स, ११ हुक्का पॉट, चिलीम पाईप व दोन मोटारसायकल जप्त केल्या आहेत.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण, अंमली पदार्थविरोधी पथकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गायकवाड, अमली पदार्थविरोधी पथक-१ गुन्हे शाखा व सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.

get_footer();