आवृत्ती पुणे
← Back to Homepage

हॉटेल साहिलचे नितीन नाईक यांच्यावर गुन्हा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 16, 2022
Spread the love

खडक पोलिसांत फिर्याद : सहा वर्षात परतावा न देता केली फसवणूक

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : हॉटेल, इलेक्ट्रीकल, जीम, बांधकाम व्यवसायातील कंपन्यांच्या विस्तारीकरणासाठी चांगल्या परतावाचे आमिष दाखवून गुंतवणुकीस भाग पाडल्यानंतर गेल्या ६ वर्षात कोणताही परतावा न देता फसवणूक केल्याप्रकरणी व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी शैलेंद्र पाटील (वय ४९ रा. मिरा सोसायटी, शंकरशेठ रोड) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी नितीन नाईक (रा. रामसुख अपार्टमेंट, सभाषनगर, शुक्रवार पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. नितीन नाईक यांनी त्यांचे हॉटेल व्यवसाय, ईलेक्ट्रीकल व्यवसाय, जीम व्यवसाय, बांधकाम व्यवसाय इत्यादी व्यवसाय असल्याचे व हॉटेल साहिल व सिमृत फूड या कंपन्यांचा विस्तार करण्यासाठी गुंतवणुक करण्यास सांगितले. गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून फिर्यादीकडून ६ लाख ८९ हजार ५८० रुपये घेतले. जून २०१४ मध्ये त्यांनी ही गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर फिर्यादी यांना त्याबदल्यात त्यांना सुरक्षेपोटी ३१ मे २०२१ या तारखेचा धनादेश दिला होता. मात्र, त्यांनी परतावा न देता दिलेल्या रक्कमेचा अपहार केला म्हणून गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक गाडे तपास करीत आहेत.

get_footer();