आवृत्ती पुणे
← Back to Homepage

हॉटेलच्या व्यवसायातून 55 लाखांची फसवणूक

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 6, 2022
Spread the love

वानवडी पोलिसांत रवीअण्णा दांडेली आणि रमेश भंडारीवर गुन्हा

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : भागीदारीमध्ये सुरु केलेल्या हॉटेल व्यवसायातून एकाची 55 लाखाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन जणांवर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ऑगस्ट 2017 ते जानेवारी 2021 या कालावधीत वानवडी गाव येथे घडला.

रवीअण्णा दांडेली (रा. बी.टी. कवडे रोड, दळवीनगर, पुणे), रमेश भंडारी (रा. जगताप चौक, वानवडी, पुणे) यांच्याविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कृष्णा मणिकल (वय-42 रा. ओम सोसायटी, बी.टी. कवडे रोड, दळवीनगर, पुणे) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी कृष्णा मणिकल आणि रवी दांडेली यांनी भागीदारीत शिपयार्ड हॉटेल सुरु केले होते. यासाठी रमेश भंडारी यांची जागा भाडेतत्वावर घेतली होती. फिर्यादी यांनी हॉटेल सुरु करताना रमेश भंडारी याला आरटीजीएस आणि रोख स्वरुपात 55 लाख रुपये देऊन व्यवसायात गुंतवणूक केली होती. 2018 मध्ये फिर्यादी हे भागीदारीतून बाहेर पडले. त्यानंतर रवि दांडेली याने फिर्यादी हे भागीदार असल्याचे माहित असूनदेखील त्यांच्या परस्पर रमेश भंडारी याला हॉटेल विकले. दरम्यान, फिर्यादी यांनी त्यांनी गुंतवलेले पैसे मागितले. त्यावेळी दांडेली याने पैसे देण्यास नकार देऊन जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी कृष्णा मणिकल यांनी तक्रार अर्ज दिला होता. तक्रार अर्जाची तपासणी करुन पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वानवडी पोलीस करीत आहेत.

get_footer();