आवृत्ती पुणे
← Back to Homepage

हॉटेलमधील भांडणात मांजरी बु।।च्या माजी सरपंचावर गोळीबार!

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • May 6, 2022
Spread the love

हडपसर पोलिसांत फिर्याद : खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : हॉटेलमध्ये एकाच टेबलावर बसलेल्याचे दुसर्‍याशी भांडणे झाल्याने साथीदारांना बोलावून मांजरी बु।।च्या माजी सरपंचावर गोळीबार करीत दगड, विटाने मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना मांजरीमधील श्रीराम हॉटेलमध्ये रात्री साडेनऊ वाजता घडली.

पुरुषोत्तम ऊर्फ अण्णा धारवाडकर (रा. मांजरी बु।।, ता. हवेली, जि. पुणे) असे जखमी झालेल्या सरपंचाचे नाव आहे.

हडपसर पोलिसांनी नंदू शेडगे, चंद्रकांत घुले व त्यांच्या तीन साथीदारांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, पुरुषोत्तम धारवाडकर हे काही जणांसह रात्री श्रीराम हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. त्यांच्या टेबलवर बसलेल्या संजय झुरंगे याचे चंद्रकांत घुले याच्याबरोबर भांडण झाले. धारवाडकर यांचा त्याच्याशी काही संबंध नव्हता. भांडणानंतर घुले याने फोन करुन साथीदारांना बोलावून घेतले. धारवाडकर जेवण करुन हॉटेलमधून बाहेर पडत असताना तिघे जण मोपेडवरुन तेथे आले. त्यांच्यातील एकाने धारवाडकर यांच्या दिशेने गोळीबार केला. ती धारवाडकर यांना लागली नाही. त्यानंतर त्यांनी तेथे पडलेल्या दगड, विटांनी धारवाडकर यांना मारहाण केली. दगड डोक्यात घातल्याने त्यात ते जबर जखमी झाले. कोणी वाचवायला आले तर त्यांचीही अशीच गत करु अशी धमकी देऊन ते पळून गेले. धारवाडकर यांना तातडीने नोबेल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हडपसर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

get_footer();