आवृत्ती पुणे
← Back to Homepage

हॉटेलमालकाला जीवे मारण्याचा प्रयत्न करणारे जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • April 7, 2022
Spread the love

भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी : आरोपींना न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी

महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क

पुणे : जागेच्या वादातून हॉटेलमालकाला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना भारती विद्यापीठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

अभिषेक सुभाष कोळपे (वय 22), अक्षय दीपक गायकवाड (वय 27), शंकर ऊर्फ बंडू सुरेश कोळपे (वय 29), प्रवीण पोपट तिखोळे (वय 29, सर्व रा. मु.पो. जांभळी, ता. भोर, जि. पुणे आणि परशुराम अंकुळ कवडे (वय 29, रा. शाहू कॉलनी, कर्वेनगर, पुणे) या आरोपींना ताब्यात घेऊन तपास केला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

पोलीस अंमलदार राहुल तांबे व विक्रम सावंत यांना गुन्ह्यातील फरार आरोपीची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सापळा रचून आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली. आरोपीकडून क्रिकेटचा स्टम्प, दगड जप्त करून पोलीस कोठडी घेतली आहे.

पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संगीता यादव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक यांच्या मार्गदर्शनाकाली सहायक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता, पोलीस अंमलदार रवींद्र चिप्पा, गणेश भोसले, सचिन पवार, हर्षल शिंदे, गणेश शेंडे, धनाजी धोत्रे, राहुल तांबे, अभिजित जाधव, सचिन गाडे, विक्रम सावंत, आशिष गायकवाड, अवधूत जमदाडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

get_footer();