आवृत्ती पुणे
← Back to Homepage

आई, बहीण, मुलगी, मुलाला कोंडून ठेवून मागितली तीन लाखांची खडणी

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 19, 2021
Spread the love

हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : भेकराईनगर-तुकाईदर्शन-बिबवेवाडी दरम्यान घडला प्रकार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : मित्राचे पैसे दिले नाही म्हणून घरामध्ये जबरदस्तीने घुसून दोन हजार रुपयांची सोन्याची अंगठी, चार हजार रुपयांचा मोबाईल काढून घेतला. आई, बहीण, मुलगी व मुलाकडून टेम्पोची चावी घेऊन तीन लाख रुपयांची मागणी करीत कोंडून ठेवले. तीन लाख रुपये द्या नाही, तर अंगावर कुत्रा सोडीन, किडण्या विकेल, तुला धंद्याला बसवेल अशी धमकी देऊन दहशत निर्माण केली. भेकराईनगर- तुकाईदर्शन- बिबवेवाडी दरम्यान ही घटना घडली.

शेरॉन शॅमवेल बोरडे (वय २१, रा. नाना पेठ, पुणे), सोनू सौदागर गुड्डगडे (वय २६, रा. गायकवाडवस्ती, वडकी, ता. हवेली) यांच्यासह बिबवेवाडी आणि बोरकरवस्ती, लोणी काळभोर येथील दोन महिलांना अटक केली आहे. याप्रकरणी फरीन मुनीर पटेल (वय २४, रा. काळेपडळ, हडपसर) यांनी फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी आरोपी दोघे मित्र असून, त्यांच्यामध्ये आर्थिक व्यवहार झाला होता. दरम्यान, फिर्यादीच्या मित्राकडून घेतलेले पैसे परत दिले नाही म्हणून आरोपींनी दोन हजार रुपयांची सोन्याची अंगठी व चार हजार रुपये व मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला. तसेच टेम्पोची चावी घेऊन तीन लाख रुपयांची मागणी करून सर्वांना घरामध्ये कोंडून ठेवले. पैसे द्या नाही, तर कुत्रा अंगावर सोडीन, तुझ्या किडण्या विकून, तूला धंद्याला बसवेल, अशी धमकी देऊन दहशत निर्माण केली.

हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र ढावरे पुढील तपास करीत आहेत.

get_footer();