आवृत्ती पुणे
← Back to Homepage

अवैध सावकारी करणाऱ्या तिघांना ठोकल्या बेड्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • March 19, 2022
Spread the love

पोलीस आयुक्तांचे आदेश : खडंणी विरोधी पथक-१ची कारवाई

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : शहरामध्ये अवैध सावकारी करुन खंडणी मागणाऱ्या तीन खासगी सावकारांना अटक केली आहे. गुन्हे शाखा खंडणी विरोधी पथक-१च्या पथकाने कारवाई केली. आरोपींनी तक्रारदार यांच्याकडे खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी दिली होती. आरोपींना सापळा रचून त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे.

व्यंकटेश नागेंद्र चोक्कारपू (वय ५२, रा. लिला निवास, साई सत्यम पार्क, वाघोली), शांतीलाल देवराम पाटील (वय ५९, रा. लेन नं.६, साई सत्यम पार्क, वाघोली), वसंत कुमार राममिलन मिश्रा (वय ५६, रा. साई सत्यम पार्क, लेन नं.७ वाघोली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शहरात अवैध सावकारी करणाऱ्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार खंडणी विरोधी पथक एकच्या पथकाने तिघांना अटक केली आहे. तक्रारदार यांनी सुभाष मांडोळे, व्यंकटेश चोक्कारपू व इतरांविरुद्ध अवैध सावकारी करुन खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद लोणीकंद पोलीस ठाण्यात दिली होती. तक्रारीची चौकशी करुन पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. पुढील तपास खंडणी विरोधी पथक एकचे पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव करीत आहेत.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक-१चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, सहायक पोलीस निरीक्षक विवेक पाडवी, पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, पोलीस अंमलदार, पांडुरंग वांजळे, यशवंत ओंबासे, मधुकर तुपसौदर्य, रविंद्र फुलपगारे, हेमा ढेबे, मिना पिंजण, किशोर वग्गू, चेतन चव्हाण, मारुती पारधी, नितीन कांबळे, रमेश चौधर, दुर्योधन गुरव, अमोल आवाड, विजय कांबळे, विवेक जाधव, नितीन रावळ, प्रफुल्ल चव्हाण, अमर पवार, प्रविण कारळे, सचिन पवार, प्रदिप गाडे, कोळगे व तेजाराणी डोंगरे यांच्या पथकाने संयुक्त कारवाई केली.

get_footer();