आवृत्ती पुणे
← Back to Homepage

इंदापूरमधील कर्मयोगीच्या संचालकाच्या मुलाचा मृत्यू

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 20, 2021
Spread the love

पुणे-सोलापूर महामार्गावर झाला अपघात : विश्वास देवकाते आणि संतोष पवार जखमी

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे :ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीचे टायर फुटल्याने तो बदलत असताना पाठीमागून येणाऱ्या खासगी बस चालकाचा ताबा सुटून अपघात झाला. या अपघातात एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात गागरगाव (ता. इंदापूर, जि. पुणे) येथे गुरुवारी (दि. १८) रात्री साडेअकराच्या सुमारास झाला.

आदित्य विश्वास देवकाते (वय १८) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचे नाव असून, विश्वास रंगनाथ देवकाते (वय ४५) आणि संतोष अंकुश पवार (रा. मदनवाडी, ता. इंदापूर) हे जखमी झाले आहे.

आदित्य देवकाते हा कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे नुतन संचालक विश्वास देवकाते यांचा मुलगा होता.
पोलिसांनी सांगितले की, गुरुवारी रात्री साडेअकराच्या दरम्यान ऊसाने भरलेला ट्रॅक्टर (एमएच 42 क्यू 4122) पुणे बाजूकडून सोलापूरच्या दिशेने जात होता. त्यावेळी पुढील ट्रॉलीचा टायर फुटला. हा टायर बदलत असताना पुण्याहून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या खासगी बस (एमएन 01 बी 1440) वरील चालकाचे नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटल्याने बसची ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला पाठीमागून जोरात धडक बसून अपघात झाला. या अपघातात विश्वास देवकाते आणि संतोष पवार हे तिघे जखमी झाले.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलीस मदत केंद्राचे सहायक फौजदार भागवत शिंदे, पोलीस हवालदार उमेश लोणकर व पोलीस नाईक नितीन जगताप यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना आदित्य देवकाते याचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

get_footer();