आवृत्ती पुणे
← Back to Homepage

‘इंडियन एस्कॉर्ट सर्व्हिस’च्या भुलभुलैयात गमावले 17 लाख

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • April 8, 2022
Spread the love

दत्तवाडी पोलिसांत फिर्याद : प्लेबॉय होण्याच्या नादात वडिलांच्या सेवानिवृत्तीचा पैसा गमावला

महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क

पुणे : प्लेबॉय कंपनीचे लायसन्स काढण्यासाठी व मेंबर होण्यासाठी रजिस्ट्रेशन करुन एक ते दोन तासात अडीच ते तीन हजार रुपये कमवा अशा जाहिरातीला एक तरुण भुलला आणि तब्बल 17 लाख 38 हजार रुपये गमावून बसल्याचा प्रकार पुण्यात समोर आला आहे. वेगवेगळी कारणे सांगून त्याच्याकडून वेगवेगळ्या फोन पे वर 25 जुलै ते 24 ऑक्टोबर 2021 दरम्यान 17 लाख 38 हजार 822 रुपये भरायला लावले.

याप्रकरणी एका 27 वर्षाच्या तरुणाने दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी यांच्या फेसबुकवर प्लेबॉय कंपनीचे लायसन्स काढण्यासाठी व मेंबर होण्यासाठी इंडियन एस्कॉर्ट सर्विसवर ऑनलाईन रजिस्टेशन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यात एक ते दोन तासात अडीच ते तीन हजार रुपये कमवा अशी जाहिरात करण्यात आली होती. फिर्यादीने त्यावर दिलेल्या नंबरवर संपर्क साधला असता, त्यांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायला सांगितले. त्यानुसार त्यांनी रजिस्ट्रेशन केल्यावर लायसन्स फी, रुम भाडे, पोलीस व्हेरिफिकेशन, पिकअप ड्रॉप, लेट फी पॉलिसीची रक्कम व त्याची लेट फी अशी वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून वेगवेगळ्या फोन पे वर 25 जुलै ते 24 ऑक्टोबर 2021 दरम्यान 17 लाख 38 हजार 822 रुपये भरायला लावले. त्यानंतर प्लेबॉय कंपनीने कोणत्याही पॉलिसीचा फायदा न देता फिर्यादीचे पैसे परत न करता फसवणूक केली आहे. तरूणाने वडिलांच्या सेवानिवृत्तीचा पैसा ‘इंडियन एस्कॉर्ट सर्व्हिस’च्या भुलभुलैयात गमावला. पोलीस निरीक्षक खोमणे अधिक तपास करीत आहेत.

get_footer();