आवृत्ती पुणे
← Back to Homepage

जखमी दुचाकीस्वाराचा मोबाईल पळविणारा गजाआड

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 20, 2021
Spread the love

गुन्हे शाखेच्या युनिट-२ची कारवाई : सातारा रस्त्यावरील स्वामी विवेकानंद पुतळ्याजवळील प्रकार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : अपघात झाल्यानंतर तातडीने मदतीसाठी अनेकजण धाव घेतात. मात्र, मोटारसायकल घसरुन चालक जखमी झाला असताना त्याला मदत करण्याऐवजी त्याच्या खिशातील मोबाईल जबरदस्तीने चोरुन नेला होता. हा प्रकार सातारा रोडवरील स्वामी विवेकानंद पुतळ्याजवळ १० जून रोजी सायंकाळी ५ वाजता घडला होता. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने एका चोरट्याला अटक केली आहे.

ईश्वर दगडु भडकवाड (रा. जय मल्हार अपार्टमेंट, दांडेकर पुल) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. याप्रकरणी सागर नवघने (वय ३१, रा. श्रीनगर सोसायटी, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.


पोलिसांनी सांगितले की, सागर नवघने हे मोटारसायकलवरुन जात असताना १० जून रोजी सायंकाळी त्यांची मोटारसायकल घसरुन ते पडले होते. ते पडलेले पाहून काही जण धावून आले. त्यात ईश्वर भडकवाड याने ते खाली पडल्याचे पाहून त्याचा गैरफायदा घेऊन त्यांचा १५ हजार रुपयांचा मोबाईल हिसका मारुन चोरुन नेला होता. गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने आता ईश्वर भडकवाड याला पकडले. त्याच्याकडे काही चोरीचे मोबाईल आढळून आले. त्या मोबाईल मालकाचा शोध घेत असताना हा प्रकार उघडकीस आला आहे
.

get_footer();