आवृत्ती पुणे
← Back to Homepage

इलेक्ट्रिक बाईक भाड्याने घेऊन परस्पर विक्री करणारे जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 1, 2021
Spread the love

समर्थ पोलिसांची कारवाई : नरेंद्र पुरुड नरेंद्र मोटर्स नावाने दुचाकी खरेदी-विक्रीचे दुकान चालवतो

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

धानोरीतील श्राईड प्रा. लि. दुकानातून इलेक्ट्रिक तीन बाईक आठ दिवसांसाठी भाड्याने घेऊन त्यांची परस्पर विक्री करणाऱ्या तिघांना पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून ९० हजार रुपये किमतीच्या बाईक जप्त करण्यात आल्या असून, तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

अरीश रेमंड धवर (वय ३१, रा. लक्ष्मी रेसिडेन्सी, पठारे वस्ती, लोहगाव, मूळ रा. ताडदेव, एसी मार्केटजवळ, मुंबई), अंबरेश शांतनूर बिदनूर (वय ३३, रा. पठारेवस्ती, लोहगाव, मूळ रा. गुलबर्गा, कर्नाटका), नरेंद्र विजय पुरुड (वय ३७, रा. नाना पेठ, पुणे) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.

पोलिसांनी सांगितले की, धानोरीतील श्राईड इंडिया प्रा. लि. येथील दुकानातून तीन इलेक्ट्रिक बाईक भाड्याने घेऊन परत न दिल्याने समर्थ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. त्याचा तपास सुरू असताना तिन्ही ईलेक्ट्रिक बाईक नाना पेठ येथे असल्याची माहिती पोलीस हवालदार रणजीत उबाळे यांना सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार घटनास्थळी जाऊन पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन ९० हजार रुपये किमतीच्या तिन्ही बाईक जप्त केल्या. नरेंद्र पुरुड हा नाना पेठेजवळली रास्ता पेठ येथे नरेंद्र मोटर्स नावाने दुचाकी खरेदी-विक्रीचे दुकान चालवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप जोरे करीत आहेत.


अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे, सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर, समर्थ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप जोरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक सतीश भालेराव, पोलीस अंमलदार सणजीत उबाळे, संतोष काळे, सुशील लोणकर, सुभाष पिंगळे, हेमंत पेरणे, शुभम देसाई, सुभाष मोरे, निलेश साबळे, विठ्ठल चोरमले, महेश जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.

get_footer();