आवृत्ती पुणे
← Back to Homepage

आंतरराष्ट्रीय पेंटिंग व्यवहारात व्यावसायिकाला 4.5 कोटींना गंडा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 13, 2021
Spread the love

मुंढवा पोलिसांत तक्रार : जेरार्ड मार्टी यांच्याबरोबर केटीएमएस कंपनीचे ७-८ व्यवहार

पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

आंतरराष्ट्रीय पातळीवर मौल्यवान पेंटिंगच्या खरेदी व्यवहारात नायजेरियन सायबर चोरट्यांनी ई मेल हॅक करुन पुण्यातील व्यावसायिकाला तब्बल साडेचार कोटी रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी पुण्याच्या सहकारनगर परिसरातील एका 48 वर्षीय व्यावसायिकाने मुंढवा पोलिसांना फिर्याद दिली आहे.याबाबत पोलिसांनी सांगितले की, व्यावसायिकाने यांची केटी एमएस प्रॉपर्टीज ही कंपनी आहे. खळदकर यांच्या केटीएम एस प्रॉपर्टीज या कंपनीमार्फत आंतरराष्ट्रीय पातळीवर मौल्यवान पेंटिंगची खरदी विक्री केली जाते. कंपनीचा परदेशातील जेरार्ड मार्टी यांच्याबरोबर मौल्यवान पेंटिंग खरेदी करण्याचा व्यवहार सुरु होता. सायबर चोरट्याने जेरार्ड मार्टी या कंपनीचा बनावट ई मेल आयडी तयार करुन त्यांची ओळख चोरुन तो ईमेल केटीएम एस कंपनीचे कॅरोलिन यांना पाठविला.


कॅरोलीन यांना त्या मेलमध्ये स्वत:चे बँक डिटेल पाठवून कॅरोलीन यांचा ई मेल क्रॅक केला. हा व्यवहार स्वत: जेरार्ड मार्टी यांचे सोबत असल्याचे पाठविले. कॅरोलीन यांचा ई मेल अनधिकृत रित्या वापरुन बनावट दस्त ऐवज तयार केला.

जेरार्ड मार्टी यांच्याबरोबर केटीएमएस कंपनीसोबत झालेल्या व्यवहाराची वेगवेगळ्या ७ ते ८ व्यवहार झाले. कंपनीने जेरार्ड मार्टी यांच्या बँकेचा खातेक्रमांक समजून सायबर चोरट्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले. असे ५ लाख ९७ हजार ७४ डॉलर इतकी रक्कम (४ कोटी ४८ लाख ५८ हजार रुपये) सायबर चोरट्यांनी स्वत:च्या खात्यावर घेऊन कंपनीची फसवणूक केली. २६ मार्च ते ७ मे २०२१ दरम्यान हा व्यवहार झाला होता. आपली फसवणूक झाल्याचे आता कंपनीला समजल्यानंतर त्यांनी मुंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
पोलीस निरीक्षक विजय पाटील अधिक तपास करीत आहेत.

get_footer();