आवृत्ती पुणे
← Back to Homepage

जाब विचारणाऱ्या बापाच्या डोक्यात घातली बिअरची बाटली

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 6, 2021
Spread the love

हडपसर शिंदेवस्ती परिसरातील घटना : मुलीला शिवीगाळ केल्याच्या प्रकारावरून झाले भांडण

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : मुलीला शिवीगाळ करतो असा जाब विचारल्याने एकाने मुलीच्या वडिलांच्या डोक्यात बिअरची बाटली मारुन जखमी केले. ही घटना हडपसरमधील शिंदेवस्ती येथील आण्णासाहेब मगर शाळेच्या जवळ २ नोव्हेंबरला साडेपाच वाजता घडली.

हडपसर पोलिसांनी गौरव कांबळे (वय ३०, रा. शिंदेवस्ती, हडपसर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एका ४० वर्षाच्या व्यक्तीने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी यांच्या मुलीला गौरव कांबळे याने शिवीगाळ केली होती. त्याचा जाब तिच्या वडिलांनी विचारल्याने राग आल्याने गौरव कांबळे याने त्यांना शिवीगाळ करुन बिअरची बाटली त्यांच्या डोक्यात मारुन लोखंडी रॉडने मारहाण करुन त्यांना जखमी केले. पोलीस हवालदार गव्हाणे तपास करीत आहेत.

get_footer();