आवृत्ती पुणे
← Back to Homepage

रतनलाल जैन यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान

maharashtra jain warta • News Slider, Political, Previous Issue, Social • June 19, 2023
Spread the love

पुणे शहर भाजपा व्यापारी आघाडीच्या वतीने व्यापारी स्नेहमेळाव्याचे आयोजन

महाराष्ट्र न्युज नेटवर्क

पुणे : पुणे शहर भाजपा व्यापारी आघाडीच्या वतीने आयोजित व्यापारी स्नेह संमेलन बिबवेवाडी येथील यश लॉन्स येथे संपन्न झाले. या मेळाव्याला पुण्यातील सुमारे हजारो व्यापारी उपस्थित होते. या निमित्त प्रमुख व्यापाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, राजेश पांडे, सुनील कांबळे, पुणे शहर भाजपा व्यापारी आघाडचे अध्यक्ष महेंद्र व्यास, वरिष्ठ उपाध्यक्ष संतोष जैन, यांच्यासह पुणे शहर भाजपा व्यापारी आघाडी चे पदाधिकारी आणि मान्यवर व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्यामध्ये प्रसिद्ध उद्योगपती संतोष जैन यांचे वडील रतनलाल जैन यांना “जीवनगौरव” पुरस्काराने गौरविण्यात आले यावेळी त्यांच्या परिवारातील विद्या संतोष जैन, वंश संतोष जैन यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पुणे महाराष्ट्र राजस्थान येथील शैक्षणिक, धार्मिक, सामाजिक कार्यांमध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे व ते राजस्थानयेथील संभवनाथ मंदिराचे मुख्य ट्रस्टी आहेत.

get_footer();