आवृत्ती पुणे
← Back to Homepage

जुन्या वादातून गंभीर जखमी करणारा जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 28, 2021
Spread the love

उत्तमनगर पोलिसांत गुन्हा : उत्तमनगरमधील सार्वजनिक रस्त्यावरील प्रकार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : जुन्या वादातून शिवीगाळ करीत डोक्यात मारून गंभीर जखमी करीत जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास जेरबंद केले.

ही घटना शनिवारी (दि. २६ सप्टेंबर) गुलमोहर अपार्टमेंट, मासेआळीसमोरील बोळात सार्वजनिक रस्त्यावर उत्तमनगर येथे घडली.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीचे भावासोबत जुन्या वादातून आरोपीने साथीदारांच्या मदतीने शिवीगाळ करून डोक्यात मारहाण करीत गंभीर जखमी केले. त्यानंतर आरडाओरडा करीत दहशत निर्माण केली. पुढील तपास उत्तमनगर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक रोकडे करीत आहेत.

get_footer();