आवृत्ती पुणे
← Back to Homepage

कार्ला परिसरातील बंगल्यात ‘अश्लिल’ डान्स पार्टीवर पोलिसांची धाड

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 15, 2021
Spread the love

लोणावळा पोलिसांची कारवाई : 8 महिलांसह 17 जणांवर गुन्हा, 74 लाखांचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : लोणावळा पोलिसांनी कार्ला परिसरातील एका बंगल्यात सुरु असलेल्या डान्स पार्टीवर छापा टाकून 9 पुरुष आणि 8 महिलांवर गुन्हा दाखल करुन रोख रक्कम, मोबाईल फोन, पाच चारचाकी वाहने, स्पीकर असा एकूण 74 लाख २७ हजार ६३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचे सांगितले.

ऋषिकेश संजय पठारे, अमित कृष्णा मोरे, योगेश संदेश काशिद, विकास रामचंद्र पारगे, कैलास मारुती पठारे, स्वप्नील जगदीश तापकीर, विनोद रमेश डख, प्रसाद बाळासाहेब विर, नागेश कुंडलीक थोरवे (सर्व. रा. चऱ्होली) यांच्यासह 8 महिलांवर कारवाई केली आहे.

पोलिसांनी सांगितले की, कार्ला गावच्या हद्दीमधील एम.टी.डी.सी.जवळ दुर्गा सोसायटीमधील तन्वी बांगल्यात काही लोक स्पीकरवर गाणे लावून त्यावर अश्लिल हावभाव करुन नाचत असल्याची माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी दोन पथके तयार करुन दुर्गा सोसायटीमधील तन्वी बंगल्यावर छापा टाकला. त्यावेळी 9 पुरुष आणि 8 महिला गाण्यावर नाचत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी 17 जणांना अटक केली.

पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधीकारी राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रविण मोरे, पोलीस उपनिरीक्षक सचिन बनकर, सहायक फौजदार युवराज बनसोडे, पोलीस हवालदार खान, शेख, पवार, कदम, बोराडे, कोहिनकर, चालक पोलीस नाईक प्रणयकुमार उकिर्डे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

get_footer();