आवृत्ती पुणे
← Back to Homepage

कात्रज-भारती विद्यापीठ परिसरात अवैध धंदे बोकाळले

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 20, 2022
Spread the love

पोलीस आयुक्तांची कारवाई : वरिष्ठ पोलिस निरीक्षक ‘कंट्रोल’शी सलग्न

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : कात्रज आणि भारती विद्यापीठ परिसरात अवैध धंद्दे बोकाळल्याचं निदर्शनास आल्यानंतर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी संबंधित वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर कारवाई केली आहे. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांना 7 दिवसांसाठी शहर नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आलं आहे.

याबाबत पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधित वरिष्ठ निरीक्षकावरील कारवाईस दुजोरा दिला आहे. दरम्यान, आगामी काळात देखील ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्दे सुरू असल्याचं निदर्शनास येईल त्या संबंधित पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर तसेच संबंधित कर्मचार्‍यावर कठोर कारवाई करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

मागिल काही दिवसांपासुन भारती विद्यापीठ परिसरात तसेच कात्रज भागात मोठया प्रमाणावर अवैध धंद्दे सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांना मिळाली होती. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले काही ‘राज’ अवैध धंद्देवाल्यांकडून ‘वगैरे-वगैरे’ मार्गातून मलई गोळा करण्यात मग्न असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, परिसरात अवैध धंद्दे सुरू असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांच्यावर कारवाई केली आहे. त्यांना आगामी 7 दिवसांसाठी नियंत्रण कक्षाशी सलग्न करण्यात आले असून पोलिस स्टेशनचा चार्ज ठाण्यातीलच पोलिस निरीक्षकाकडे (सेकंड पीआय) देण्यात आला आहे.
यापूर्वी वेळोवेळी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी पोलिस स्टेशनच्या हद्दीत कुठलेही अवैध व्यवसाय सुरू होता कामा नये असा आदेश दिला होता. हद्दीत अवैध धंद्दे सुरू असल्याचं आढळून आल्यास संबंधित पोलिस निरीक्षकावर तसेच संबंधित पोलिस कर्मचार्‍यावर कारवाई करण्यात येईल हे आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी यापुर्वीच स्पष्ट केले होते. कात्रज आणि भारती विद्यापीठ परिसरातील धंद्यांबाबत वेळोवेळी कानावर येत होतं. अवैध धंद्दे सुरू असल्याचं निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी थेट वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर कारवाई केल्यानं अनेक अधिकारी तसेच कर्मचार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. पोलिस आयुक्तांच्या या कारवाईमुळे पुणे शहर पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

get_footer();