आवृत्ती पुणे
← Back to Homepage

खोट्या सह्या करून आईला फसविणाऱ्या मुलावर गुन्हा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 19, 2022
Spread the love

कोंढवा पोलिसांत गुन्हा : बँकेत गेल्यानंतर धक्कादायक प्रकार उघडकीस आला

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : आईच्या बँकेत असलेल्या ठेवी, लॉकरमधील दागिने हडप करण्यासाठी मोठ्या मुलाने चक्क आईच्या खोट्या सह्या करून रोख रकमेसह ऐवज लांबविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हादी किफायत खलपे (36) आणि रमिजा हमीद आंबेडकर (30) यांच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जबिन किफायत खलपे (62, रा. नताशा इन्क्लेव्ह, एनआयबीएम रोड, कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, हादी हा फिर्यादी यांचा मुलगा असून त्याने 15 मे ते 17 नोव्हेंबर 2020 च्या कालावधीत फिर्यादीच्या खोट्या सह्या करून वानवडीतील अ‍ॅक्सीस बँकेतून 80 हजार काढले. तसेच फिर्यादीच्या 2 लाख 75 हजारांच्या मुदत ठेवी खोट्या सह्या करून काढल्या. फिर्यादींनी लहान मुलासाठी अ‍ॅक्सीस बँकेच्या लॉकरमध्ये 30 तोळे दागिने ठेवले होते, ते देखील हादी आणि रमिजा यांनी खोट्या सह्या काढून काढून घेतले. फिर्यादी बँकेत गेल्यानंतर त्यांना हा सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात धाव घेऊन मुला विरोधात फिर्याद दिली, असून पोलिसांनी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

get_footer();