आवृत्ती पुणे
← Back to Homepage

खुनाचा प्रयत्न करून फरार झालेल्या दोघांना ठोकल्या बेड्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • April 2, 2022
Spread the love

भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी : आंबेगाव बुद्रुक येथील प्यासा हॉटेलमध्ये घडली होती घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : पार्सल घेत असताना हॉटेल मालकासोबत झालेल्या वादातून एका युवकाच्या डोक्यात स्टिलचा रॉड मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न करून फरार झालेल्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही घटना पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील प्यासा हॉटेलमध्ये रविवारी (दि. २७ मार्च २०२२) घडली होती.

जय पांडुरंग निकम (वय-21), प्रशांत प्रकाश जाधव (वय-21 दोघे रा. जांभुळवाडी रोड, दत्तनगर, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी जखमी अमोल शंकर देवगिरीकर (वय-31 रा. चरवड वस्ती, वडगाव बु) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपींविरुद्ध IPC 307,504,34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा केल्यानंतर आरोपी फरार झाले होते.

पोलिसांनी सांगितले की, रविवारी अमोल देवगीरीकर हे आंबेगाव बुद्रुक येथील प्यासा हॉटेलमध्ये पार्सल घेत होते. त्यावेळी हॉटेलचे मालक जय निकम, प्रशांत जाधव यांच्यासोबत शाब्दीक वाद झाले. याच वादातून आरोपींनी अमोल यांना शिवीगाळ करुन जीवे मारण्याच्या उद्देशाने स्टिलचा रॉड डोक्यात मारुन जखमी केले. त्यानंतर आरोपी पळून गेले. दाखल गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे व हर्षल शिंदे यांना आरोपींची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस ठाण्यातील तपास पथकाने आरोपींना अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संगिता यादव, पोलीस निरीक्षक विजय पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे, पोलीस अंमलदार रविंद्र चिप्पा, गणेश भोसले, सचिन पवार, हर्षल शिंदे, गणेश शेंडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, विक्रम सावंत, आशिष गायकवाड, अवधुत जमदाडे यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली.

get_footer();