आवृत्ती पुणे
← Back to Homepage

कोयता नाचवत पाया पडायला लावून बालाजीनगरमध्ये दहशत

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • April 4, 2022
Spread the love

पोलीस दलाने दोघांना केले जेरबंद : सहकारनगरात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा तळ

महाराष्ट्र 360 न्यूज नेवटर्क

पुणे : पुणे शहर विद्येचं माहेर घर म्हणून ओळखलं जात असलं तरी वाढत्या गुन्हेगारीमुळे पुणे शहर हे गुन्हेगारांचे शहर म्हणून ओळखले जाते की काय अशी भीती पुणेकरांकडून व्यक्त होत आहे. पुण्यात हातात कोयते घेऊन नागरिकांना मारहाण केल्याचा व्हीडीओ सोशल मीडियात व्हायरल होत असून, पोलीस गुंडांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. मात्र, पोलिसांनी कडक भूमिका घेतली असून, या प्रकरणातील दोघांना अटक केली आहे.

सोशल मीडियात व्हायरल होणारा व्हिडीओ पुण्यातील बालाजीनगर परिसरातील असून परिसरात धारदार हत्यारं घेऊन दहशत पसरवली जात आहे. हातात कोयते घेऊन मारहाण केली जात आहे. फुकट भाजी दिली नाही म्हणून मारहाण करुन लोकांना पाया पडायला लावलं जात आहे. आणि या घटनेचा व्हिडीओ व्हायरल करुन दहशत पसरवली जात आहे. या व्हिडीओमुळे पुणे पोलीस दल अ‍ॅक्शन मोडमध्ये आलं आहे.

पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानंतर अप्पर पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त तसेच वरिष्ठ अधिकारी सहकारनगर पोलीस ठाण्यात तळ ठोकून बसले आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या काही गुंडांची पोलिसांकडून धरपकडही सुरु झाली आहे. पोलिसांनी आतापर्यंत दोन जणांना अटक केली आहे. तर त्यांच्या इतर साथिदारांचा ठावठिकाणा शोधला जात आहे. या गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई सुरु करण्यात आली असताना याच गुंडांनी काल भाजी विक्रेत्या महिलेला बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर संबंधित गुन्हेगारांवर कडक कारवाई केली जाईल, असे पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी सांगितले.

get_footer();