आवृत्ती पुणे
← Back to Homepage

कोयता, पालघन, काचेच्या बाटलीने मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • March 11, 2022
Spread the love

येरवडा पोलिसांत फिर्याद : माझ्या सहकारीला बोपदेव घाटात गेल्याच्या प्रकरणावरून झाला वाद

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : माझ्या सहकारीला बोपदेव घाटात का घेऊन गेला होता, असे म्हणत कोयता, पालघन, काचेच्या बाटलीने मारहाण करणाऱ्या दोघांवर येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. येरवड्यातील तारकेश्वर मंदिर येथे पाण्याच्या टाकीजवळ ८ मार्च २०२२ ला हा प्रकार घडला.

जतीन चव्हाण (वय १८, रा. नवी खडकी, येरवडा, पुणे) यांनी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार मोटारसायकलवरील दोन अनोळखींवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी येरवड्यातील तारकेश्वर मंदिर येथून घरी जात होते. त्यावेळी फिर्यादीच्या मित्रांना शिवीगाळ व मारहाण करून धमकी देत, तुझ्याशी महत्त्वाचे बोलायचे आहे म्हणून फिर्यादीला घेऊन गेले. तू माझी सहकारी हिला बोपदेव घाटात का घेऊन गेला होता, असे म्हणून शिवीगाळ करत मोबाईल जबरदस्तीने काढून घेत लोखंडी कोयत्याने जीवे मारण्याचा प्रयत्न केला. काचेची बाटली व पालघनने बोटावर तळहातावर, पायाच्या नडगीवर वार करून गंभीर जखमी केले. पोलिसांकडे तक्रार केली, तर सोडणार नाही, अशी धमकी दिली. येरवडा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक खटके पुढील तपास करीत आहेत.

get_footer();