आवृत्ती पुणे
← Back to Homepage

कुऱ्हाडीसारखे हत्यार व लोखंडी रॉड हवेत फिरविणाऱ्यावर गुन्हा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 17, 2022
Spread the love

वानवडी पोलिसांत फिर्याद : सय्यदनगरमधील गल्ली नं.९ समोर केटरर्समध्ये घडली घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : मुझे इंतूने भेजा है, मुझे अभी हप्ता दो, और हर महिने हमे हप्ता देना पडेगा असे म्हणत कुऱ्हाडीसारखे हत्यार आणि लोखंडी रॉड हवेत फिरवून दहशत पसरविणाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना महंमदवाडी रस्त्यावरील सय्यदनगर गल्ली नं.९ समोर केटरर्सच्या दुकानात १२ फेब्रुवारी सायंकाळी साडेचार ते १३ फेब्रुवारी २०२२ रोजी पावणे अकराच्या दरम्यान घडली.

मकबूल खान (वय ३६, रा. महंमदवाडी रोड, हडपसर, पुणे) यांनी वानवडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीच्या रहेमान केटरर्समध्ये आरोपी आले आणि मुझे इंतूने भेजा है, मुझे अभी हप्ता दो, और हर महिने हमे हप्ता देना पडेगा असे म्हणत व्यवसायातून जमलेले सात हजार ६०० रुपये घेतले. त्यानंतर बिर्याणी हाऊसमध्ये जाऊन सीक कबाब बनविण्याची शेगडी फेकून देत कुऱ्हाडीसारखे हत्यार आणि लोखंडी रॉड हवेत फिरवून परिसरात दहशत माजविली. वानवडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक व्ही. व्ही. वाडकर पुढील तपास करीत आहेत.

get_footer();