आवृत्ती पुणे
← Back to Homepage

कुणाल प्रॉपटीजच्या मालकाने विकली परस्पर जमीन

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • April 4, 2022
Spread the love

लोणीकंद पोलिसांत गुन्हा : बनावट कागदपत्रे तयार करून केली फसवणूक

महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क

पुणे : जमीन खरेदी करण्याचा करारनामा करुन व्यवहार पूर्ण न करता परस्पर बनावट कागदपत्रे तयार करुन कुणाल प्रॉपटीजच्या मालकाने ही जमीन परस्पर अन्य दोघांना विकून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार हवेलीतील गट नंबर १५५१ मध्ये २२ ऑक्टोंबर २०२० ते २७ ऑगस्ट २०२१ दरम्यान घडला आहे.

याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी कुणाल प्रॉपटीजचे बापू बबन काळे (रा. निमगाव म्हाळुंगे, शिरुर), सुजाता धर्मवीर सिंह / देशमुख (रा. खराडी), परशुराम एस जाधव (रा. गणेश पार्क, हवेली) व इतर त्यांच्या सोबतचे ३ ते ४ पुरुष व ५ ते ६ अनोळखी महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी धनराज ज्ञानोबा गोरे (वय ६४, रा. गोरेवस्ती, वाघोली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, कुणाल प्रॉपर्टीजचे बापू काळे यांनी फिर्यादी यांची ८ गुंठे जमीन ही प्रति गुंठा ९ लाख रुपये दराने विकत घेण्याबाबत करारनामा केला होता. करारनामानुसार त्यांनी पैशांचा मोबदला वेळेत दिला नसून व्यवहार पूर्ण करण्यास टाळाटाळ केली. फिर्यादीची जमीन मिळकतीबाबत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्याकडून विकास आराखडा कमर्शियल झोनसाठी राखीव म्हणून मंजूर झाल्याचे समजल्याने बापू काळे याने पुन्हा फिर्यादीशी संपर्क सांधून तुमचे क्षेत्र घेण्यास तयार असल्याचे सांगितले.
फिर्यादी यांनी त्याला नकार दिला. तेव्हा त्यांच्या संमतीशिवाय ती जागा परस्पर सुजाता सिंह/देशमुख व परशुराम जाधव यांच्याशी फिर्यादीच्या जागेचा बेकायदेशीर करारनामा केला. त्यात मोहन येळे यांची बनावट सही व अंगठा केला परशुराम जाधव, सुजाता सिंह/देशमुख व त्यांचे सहकारी यांनी फिर्यादी यांच्या जमिनीचा बेकायदेशीररित्या ताबा घेण्याचा प्रयत्न केला.
फिर्यादी यांनी विरोध केल्यावर तुमच्यावर अ‍ॅट्रॉसिटीची केस दाखल करुन इतरही खोट्या गुन्ह्यात अडकवू अशी धमकी देऊन शिवीगाळ केली. घरात शिरुन तुम्ही आमच्या नादाला लागू नका, तुमचे नुकसान होईल अशी धमकी देऊन निघून गेले.
गोरे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

get_footer();