आवृत्ती पुणे
← Back to Homepage

लग्नाच्या आमिषाने युवतीवर बलात्कार करणाऱ्यावर गुन्हा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 27, 2022
Spread the love

अलंकार पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद : लग्नास नकार देऊन पीडितेची फसवणूक

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना पुण्यात समोर आली आहे. हा प्रकार 2016 ते जानेवारी 2022 या कालावधीत घडला. बलात्कार आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

युवराज शालीकराव सुर्यवंशी (वय-27 रा. मुंगसे, मालेगाव जि. नाशिक) याचावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुण्यात राहणाऱ्या 27 वर्षाच्या तरुणीने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, पीडित तरुणी आणि आरोपीची ओळख मोबाईलवर झाली. यानंतर आरोपीने पीडितेसोबत मैत्री करुन तिला वारजे ब्रिज येथे भेटण्यास बोलावले. पीडित मुलीला खडकवासला येथे नेऊन तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
त्यानंतर लग्नास नकार देऊन पीडितेची फसवणूक केली. पुढील तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक संगिता पाटील करीत आहेत.

get_footer();