आवृत्ती पुणे
← Back to Homepage

लग्नाच्या आमिषाने बलात्कार करणाऱ्या पोलीसावर गुन्हा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 20, 2022
Spread the love

कोंढवा पोलिसांत फिर्याद : लवासा, लोणावळा, ब्रह्मा आंगण सोसायटीमध्ये घडला प्रकार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार करुन नंतर लग्नास नकार देणार्‍या पोलीस अंमलदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार लवासा, लोणावळा, ब्रम्हा आंगण सोसायटी येथे २०१७ पासून ५ फेब्रुवारी २०२२ दरम्यान घडला आहे.

रमिज मुल्ला (वय ३०, रा. शिवाजीनगर पोलीस लाईन) असे या पोलीस अंमलदाराचे नाव आहे. याप्रकरणी कोंढव्यातील एका ३० वर्षाच्या तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, पोलीस अंमलदार रमिज मुल्ला हा सध्या कोंढवा पोलीस ठाण्यात नेमणूकीला आहे. त्याने कोंढव्यातील एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाऊन तिच्याशी जबरदस्तीने शारीरीक संबंध केले. त्यानंतर लग्नास नकार दिला. सर्व ठिकाणी फिर्यादीला ही माझी बायको, असे सांगून फिर्यादी यांची बदनामी केली. त्यामुळे त्यांनी फिर्याद दिली असून, पोलीस उपनिरीक्षक गपाट तपास करीत आहेत.

get_footer();