आवृत्ती पुणे
← Back to Homepage

लाकडी दांडक्याने लुटमार करणाऱ्यांवर गुन्हा

maharashtra jain warta • News Slider, Previous Issue • February 13, 2022
Spread the love

स्वारगेट पोलिसांत फिर्याद : तीन मोबाईल आणि एक हजार रुपये नेले चोरून

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : लाकडी दांडक्याने मारहाण करून तीन मोबाईल आणि रोख एक हजार असा एकूण तेरा हजार रुपयांचा ऐवज चोरून नेणाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे.

स्वारगेट-महर्षिनगर येथील सीटी इंटरनॅशनल स्कूलसमोर १२ फेब्रुवारी २०२२ रोजी पहाटे चारच्या सुमारास ही चोरीची घटना घडली.
सुसोबन हजरा (वय २८, रा. महर्षिनगर, पुणे) यांनी स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी महर्षीनगरमधील सीटी इंटरनॅशनल स्कूलसमोरील रस्त्याने मित्रासमवेत पायी घरी जात होते. त्यावेळी पाठीमागून दोन मोपेडवर तीन अनोळखी व्यक्तींनी जवळ येऊन दमदाटी करत लाकडी दांडक्याने मारहाण केली. मित्राच्या खिशातील १२ हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल आणि एक हजार रुपये रोक असा १२ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. स्वारगेट पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ पुढील तपास करीत आहेत.

get_footer();